Monday, September 21, 2020

Spoken languages program

 दर रविवार सकाळी 8.30 वाजता online class मध्ये spoken languages हा कार्यक्रम घेण्यात येत आहे यामध्ये 6 प्रादेशिक भाषा घेण्यात येत आहेत English,तामिळ, गुजराथी , तेलगू , संस्कृत, हिंदी  .

      मुलांना एका वाक्याचे या 6 भाषेत रूपांतर कसे करावेत हे शिकवण्यात येत आहेत. तसेच या भाषेत बोलताना अभ्यासगटात video तयार करण्याचे आव्हान देण्यात येत आहे. मुले स्वतःहून video तयार करत आहेत. 


Google meet online class

 दररोज सकाळी ठिक 8.30 वाजता प्रा.शा.गणपुर येथे online class जुलैपासून घेण्यात येत आहेत तसेच साधा फोन असणाऱ्या मुलांना conference call 📞 द्वारे teaching करण्यात येत आहे.

दर बुधवार आणि शनिवार इयत्ता पाचवीसाठी नवोदय व स्कॉलरशिप साठी तासिका ठिक 8 वाजता घेण्यात येत आहे.

मुलांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.



Saturday, July 18, 2020

Work from Home - weekly test

प्रा.शा.गणपुर इथे मुलांसाठी  सकाळी 8 ते 10 या वेळेत online teaching class सुरू करण्यात आला आहे . मुले घटकानुरूप शिकत आहे म्हणून त्यांच्यासाठी आठवड्यातून एकदा दर रविवारी weekly test 20 गुणांची घेण्यात येत आहे .

इयत्ता तिसरी

इयत्ता चौथी


इयत्ता पाचवी




Monday, July 13, 2020

कार्टूनसह ॲनिमेशनसहीत शैक्षणिक व्हिडिओ


  • मुलांना कार्टुन व्हिडिओ ॲनिमेशन फार आवडते व ते त्यांच्या भावविश्वात रममाण होतात , त्यांना ॲनिमेशन मुळे आपला अध्यापनाचा हेतू साध्य होतो .
  • Study from Home -  मुले घरी राहुनही पाठ्यघटक छानपैकी शिकू शकतात .


हा व्हिडिओ इयत्ता तिसरी - परिसर अभ्यास पाठ पहिला - आपल्या अवतीभवती 1 हा आहे.


ह्यामध्ये सजिव व निर्जिव घटक घेण्यात आला आहे.


या व्हिडिओ मध्ये इयत्ता तिसरी परिसर अभ्यास पाठ 2 रा अबब ! किती प्रकारचे हे प्राणी हा पाठ घेतला आहे.

Monday, June 22, 2020

Flipbook Study From Home ( शाळा बंद पण शिक्षण चालू )

Flipbook - 
 
flipbook द्वारे आपण दैनंदिन अभ्यासमालेतील मुलांनी केलेल्या कृती व उपक्रम यात दर्शवले आहे , हे पुस्तकाप्रमाणे असल्याने पालकांना ही त्यांच्या पाल्यांच्या activities दाखवणे सहज शक्य झाले आहे .
               
https://online.fliphtml5.com/ksozq/yfvf/ 
  
या Flipbook मध्ये मुलांच्या अभ्यासमालेतील ठसेकाम , संकल्प  , चित्र , कागदकाम - राजमुकूट तयार करणे , ओरिगामी पध्दतीने फुलपाखरू तयार करणे , फुलदाणी काढणे , कागदाचा शर्ट तयार करणे इत्यादी .चा समावेश आहे .




Sunday, May 17, 2020

ऊर्जा उपक्रम

मुलांना वाढदिवस म्हटले कि एक त्या दिवासाची ते आतुरतेने वाट पाहतात . त्या दिवशी शुभेच्छा देणारे मित्र त्यांच्या स्मरणात राहतात म्हणून आमच्या शाळेत आम्ही ऊर्जा उपक्रम घेत आहोत , या उपक्रमा मध्ये मुलामुलींचे वाढदिवस शाळेत परिपाठाच्या वेळी घेत आहोत.मुलाला एक पेन व पुष्पगुच्छ देऊन मोबाईल वर वाढदिवसाची धून लावत तसेच आनंदी  टाळ्या वाजवून त्या मुलाचा वाढदिवस आम्ही साजरा करतो .
                  या उपक्रमामुळे मुलांना शाळेची आवड , वाढदिवसाची तारीख स्वतः ची वा मित्राची ही लक्षात राहते . यातुन स्मरण शक्ती वाढण्यास मदत होते .



मुलामुलींचे वाढदिवस साजरे करतांना चे क्षण.


Sunday, April 26, 2020

शैक्षणिक सहल

दरवर्षी शैक्षणिक सहलीचे नियोजन करण्यात येते या शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून मुलांचे अनुभव क्षेत्र रूंदावते . त्यांच्या पुर्व माहितीत भर पडते . धरण , जैन लेण्या , ऐतिहासिक ठिकाणची माहिती मिळते . एकंदरीत मुले आनंदी होतात परत शाळेत आल्यास त्यांच्यात एक नवलपण व शाळेत आनंदी वातावरण निर्मिती होते .  शाळेची ओढ कायमच राहते व सहल जाणार म्हणून  आपल्या जवळील  खाऊच्या पैशाची बचत करून एक चांगली सवय ही मुलांच्या अंगी येते .


  
शैक्षणिक सहल सिध्देश्वर धरण.

शैक्षणिक सहल तिर्थक्शेत्र औंढा नागनाथ 


Sunday, April 19, 2020

कृती आधारीत अध्ययन Activity based learning

Activity Based learning या कार्यक्रमांतर्गत कृती ला प्राधान्य देण्यात आले आहे म्हणजेच कोणताही विषय , त्यातील अध्यापन करावयाचा घटक यात जास्तीत जास्त कृती वापरून अध्ययन अध्यापन केल्यास अधिक प्रभावी ठरते तसेच अध्ययन निष्पत्ती साध्य होण्यास मदत होते.

1] गणित विषय इयत्ता दुसरी , घटक - संख्येचा लहानमोठेपणा कृती युक्त मुलं सादर करतांना .


2] इयत्ता तिसरी विषय - English , Days of the week हा घटक कृती युक्त सादरीकरण.


3] In -out , up - down activity इयत्ता - पहिली .


Wednesday, April 15, 2020

परिसर अभ्यास उपक्रम - मोबाईल ॲपद्वारे अध्ययन व अध्यापन

परिसर अभ्यास या विषयात काही पाठ असे असतात की त्या पाठ्यघटकाचे अध्यापन करताना मुलांना स्वानुभव देणे गरजेचे ठरते. अबब!किती प्रकारचे प्राणी हा पाठ Safari central ह्या ॲप द्वारे शिकवता येतो व मुल जवळुन प्राणी पाहतात .



मुल सहजतेने व आनंददायी पध्दतीने शिकते.



इयत्ता पाचवी - सुर्यमाला व ग्रह घटक शिकवताना  Explorer app  , merge cube द्वारे नाविन्य पध्दतीने शिकवता येतो व मुल सहजतेने आनंददायी पध्दतीने शिकते.

परिसर अभ्यास विषयातील उपक्रम - बोट बाहुलीद्वारे अध्ययन व अध्यापन

मराठी , इंग्रजी , गणित या विषयाप्रमाणे परिसर अभ्यास हा विषय देखील विविध प्रकारची उपक्रम घेत शिकवल्यास मुल सहजतेने व आवडीने शिकतात.आमच्या शाळेतील काही निवडक उपक्रम पुढीलप्रमाणे -


1] बोट बाहुलीद्वारे पाठ अध्यापन व अध्ययन -



सादरीकरण - कु.निकिता काष्टे , इयत्ता - चौथी
पाठ - गड आला पण सिंह गेला.




सादरीकरण - कु.कोमल झाडे , इयत्ता - चौथी
पाठातील पात्रे व व्यक्ती रेखानुसार उत्तम सादरीकरण.



Wednesday, April 8, 2020

दप्तराविना शाळा उपक्रम

      आठवडाभर मुले शाळेत नियमितपणे येतात शिकतात त्यांना एक बदल व्हावा म्हणून दप्तराविना शाळा हा उपक्रम दर शनिवारी घेण्यात येत आहे . मुल निरनिराळ्या शैक्षणिक साहित्या चा वापर करून त्या आधारे कृती करतात .

               
                                                                        या उपक्रमात मुले गट करून वा वैयक्तिक कृती करतात. यामध्ये मुले अंक इंग्रजी मध्ये अक्षरात लिहिताना दिसत आहेत.write the numbers in the words .




स्वनिर्मित शैक्षणिक साहित्याच्या आधारे गटात days of the week घेताना मुले दिसत आहेत.




इयत्ता पहिली तील मुले देखील शैक्षणिक साहित्याचा वापर करू स्वतः शिकत आहेत.



फळ्यावर changing sentences सोडवताना.



प्रत्यक्ष कृतीद्वारे in, out,up, down शिकताना इयत्ता पहिलीतील मुले.




घड्याळ तयार करून मुले स्वतः किती वाजले हे सांगतात .




मुले या साहित्याच्या आधारे गणिती खेळ खेळताना .



word ladder हा सापशिडी प्रमाणे शब्द शिडी उपक्रम आहे.


Online Tests for the students

सुट्टी मग ती दिवाळी ची असो की उन्हाळी , शाळेला सुट्या लागल्यावर मुलं अभ्यासापासुन लांब जातात त्यांना शाळेच्या  प्रवाहात ठेवण्यासाठी किंवा चाचणी घेण्यासाठी ही online test फार उपयोगी पडते.
                    त्यासाठी पालकांचा whatsapp group तयार करून पालकांना ही मुलांची प्रगती दिसते त्याचप्रमाणे मुलांना ही हा एक चांगला नाविन्यपुर्ण अनुभव येतो.

वर्ग - पहिला

विषय - मराठी ं

Test no.1

Test no.2

विषय - गणित

Test no.1

Test no.2

वर्ग  - तिसरा
विषय - English 
Test no.1   

Test no.2

Test no.3

Test no.4      

Test no.5


विषय - मराठी
Test no.1

Test no.2

Test no.3

Test no.4

Test no.5

विषय - परिसर अभ्यास

Test no.1

Test no.2

Test no.3

Test no.4

Test no.5

विषय - गणित

Test no.1

Test no.2

Test no.3

Test no.4

इयत्ता - चौथी

विषय - मराठी

Test no.1

Test no.2

Test no.3

Test no.4

Test no.5

विषय - गणित

Test no.1

Test no.2

Test no.3

Test no.4

Test no.5

विषय - परिसर अभ्यास भाग 1

Test no.1

Test no.2

Test no.3

Test no.4

Test no.5

परिसर अभ्यास भाग 2

Test no. 1

Test no.2

Test no.3

Test no.4

Test no.5


उर्वरीत Test लवकरच upload करूत त्यासाठी blog ला नियमित भेट देत राहा.
blog - elearningzpps.blogspot.com.

Tuesday, April 7, 2020

अध्यापन करतांना शै. साहित्याचा भरपूर वापर व निर्मिती

अध्यापन प्रभावी होण्यासाठी , मुलांना पाठ्य घटक व्यवस्थित समजण्यासाठी स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य निर्मिती व वापर अत्यंत गरजेचे ठरते. विषयानुरूप, घटकानुरूप शैक्षणिक साहित्य वापर करावा .



संख्येचा लहानमोठेपणा ठरवण्यासाठी अशाप्रकारे शैक्षणिक साहित्या चा वापर होतो.



English विषयात face & feeling chapter शिकवातांना शैक्षणिक साहित्याचा वापर करता येतो.




knowing about tail words.




English bank या शैक्षणिक साहित्यात मुलांना इंग्रजी वाक्ये , प्रश्न संग्रह भरपूर चिट्ठ्या आहेत मुले त्या सहजतेने वाचन करतात .




question set मुले वाचन करतात व त्याचा अर्थ समजून उत्तरे हि देतात.







std 1 & 2 nd साठी ' a ' उच्चार असणारे शैक्षणिक साहित्य .



मोबाईल ॲप द्वारे अध्ययन व अध्यापन

काही पाठ्य घटक शिकवतांना मुलांना प्रत्यक्ष अनुभूती देणे गरजेचे ठरते अशावेळी mobile bolo app , safari central app ,  solar Explorer app , इत्यादी द्वारे मुलांना स्वतः अनुभूती येते .



Exolorer app द्वारे आपली सुर्यमाला घटक शिकवायला सहज व सोपे गेले तसेच मुलांनी सुर्यमालेतील ग्रह , बुध ,  शुक्र , मंगळ , गुरू इत्यादी चे स्थान मुलांच्या लक्षात आले.



 

इयत्ता तिसरी च्या मुलांना  अबब! किती प्रकारचे प्राणी हा घटक शिकवतांना मुलांनी स्वतः जंगलातील प्राणी जवळुन अनुभवायला मिळाली. हत्ती , जिराफ , सिंह , वाघ , चित्ता , अस्वल , हे प्राणी पाहायला व त्यांच्या  हालचाली त्यांचे वेगवेगळे आवाज अनुभवायला मिळाले.

कला व कार्यानुभव या विषयांतर्गत उपक्रम

मराठी, english या विषया प्रमाणेच कला व कार्यानुभव ह्या विषयाचे अध्यापन व त्यातील कृती घेणे तितकेच गारजेचे आहे . आठवड्यातून तीन तासिकेचे नियोजन असायला हवेच , मुलांना एक नवा अनुभव मिळतो व मुले शाळेत पर्यायी अभ्यासात रमतात.






वाळलेल्या कद्दुपासुन मासा तयार करणे.



मुलांनी त्यांच्या कल्पकतेनुसार शाळेची तयार केलेली सुंदर अशी प्रतिकृती .




पर्यावरणास पुरक अशा कागदी पिशवी पेपर पासुन तयार करण्यात आल्या आहेत.





मुले स्वनिर्मितीचा आनंद घेतात.




 मुलींनी राष्ट्रीय सणासाठी वापरता येतील अशी सुंदर तिरंगा बॕज तयार केला आहे , रंगीत पेपर पासुन अतिशय उपयुक्त बॕज तयार केले आहे.



 
ओरीगामी पध्दतीने रंगीत  कागदापासुन  सुंदर  अशी फुलपाखरे तयार केली आहेत.

लेक शिकवा लेक वाचवा आभियानांतर्गत उपक्रम

 लेक शिकवा लेक वाचवा  - सावित्री बाई फुले जयंती निमित्त शाळेत विविध प्रकार चे उपक्रम घेण्यात येतात लेक शिकवा लेक वाचवा या कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे घेण्यात येते.




मुलींनी त्यांच्या गोड आवाजात गायलेली ओवी व गीत .     


तसेच महिला पालक मेळावा आयोजीत केल्या जातो व महिला , माता पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहतो व मुलांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देतात.



शाळा प्रवेशोत्सव , स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य व वापर

शाळा प्रवेशोत्सव -


स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य  -
शैक्षणिक साहित्याचा अध्यापन करतांना पुरेपूर वापर केल्यास पाठ्यघटक समजण्यास मदत होतो व ते स्वतः तयार केलेले असल्यास प्रभावी ठरते.




 



Thursday, April 2, 2020

इंग्रजी विषय उपक्रम



नमस्कार ,
             नमस्कार सदर शैक्षणिक ब्लॉग हा माझ्या शाळेविषयी ची माहिती देणारा आहे.माझ्या शाळेत माझ्या वर्गात विषय निहाय वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आम्ही नियमितपणे राबवत असतो प्रत्येक मूल हे वेगळं असतं आणि ते त्याच पद्धतीने शिकत या तत्वाने आम्ही आमचे उपक्रम सादर करीत आहोत.
               प्रा.शा. गणपुर माझ्या शाळेच्या अंतर्गत होणारे विविध कार्यक्रम तसेच पालक मेळावे शैक्षणिक कृती कार्यक्रम मालिका मुलांनी स्वतः च्या चालीवर रचलेल्या पाठ्यपुस्तकातील कविता , भाषा विषयातील पाठाचे नाट्यरूपात सादरीकरण , परिसर अभ्यास या विषयात पाठाचे बोट बाहुली द्वारे सादरीकरण ,  नाट्यरूपात सादरीकरण तसेच कला , कार्यानुभव विषयातील मुलांनी तयार केलेल्या सुंदर साहित्य, दिवाळी गृहपाठ , इंग्रजी विषयांतर्गत विविध उपक्रम  ,अध्ययन निष्पत्ती वर आधारित नियोजन व त्यावर आधारित कृती इत्यादी.

याबरोबरच स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य व त्याचा अध्यापनात वापर देखील आपल्याला पाहता येईल .

धन्यवाद !
भाषा विषय उपक्रम -   प्रत्येक  मुलाचा  अध्ययन स्तर हा वेगवेगळा  असतो  काही मुलं  जलद गतीने शिकतात तर काही मुलांना थोडाफार वेळ लागतो मग ज्या मुलांना थोडाफार वेळ लागतो त्यासाठी काही खास विशेष असे उपक्रम राबवावे लागतात चला तर मग आपण काही उपक्रम आहेत जे मी माझ्या शाळेमध्ये राबवले आहेत ते आपण पाहूया अगदी सहज आणि सोप्या पद्धतीची उपक्रम आहेत.सोबतच youtube ची link आहे त्यावर माझ्या वर्गातील उपक्रम पाहु शकता.
उपक्रम यादी    -                                                                1]  शेपूट धरणे -
उदा -  गणपूर - रस - ससा - सरिता -तराजू  - जग- गोष्टी  इत्यादी      2]  शब्दकमळ   -  
उदा -  यामध्ये शैक्षणिक साहित्याचा वापर करण्यात आला आहे रफारयुक्त शब्दांचा यात समावेश आहे . जसे कि , हर्ष , वर्ग , वर्णन , वर्षे , कार्यक्रम , श्रृतिका , प्रश्न , आकृती , स्पर्श  , इत्यादी      

3 ] शब्दकोडी -      उदा - 1) सुपासारखे माझे कान ,  जंगलात मला मान ओळखा पाहु मी कोण ?   2) डोक्यावर तुरा दिसतो छान राष्ट्रीय पक्षाचा मला मान  इत्यादी .

4]चिट्ठीखेळ -  ह्या उपक्रमामध्ये  मुले अभिव्यक्त होताना दिसतात. हा चिट्ठींचा खेळ आहे यात मी पाहिलेला मोर , मला आवडत फुल , माझा गाव , माझी आई , माझा मित्र , मी फुलपाखरू झाले तर , इत्यादी . प्रकारच्या चिट्ठ्या आहेत मुले  चिट्ठी खेळ या बॉक्स मधील  एक चिट्ठी उचलून दोन - तीन ओळीत स्वतः चे मत मांडतील व व्यक्त होतील .म्हणजेच ते स्वतः बोलते होऊन माहिती देतील .                                                                           

4] शब्द डोंगर -  या उपक्रमात मुले एका शब्दापासुन अनेक वाक्ये तयार करतात व त्याची रचना एका वाक्य डोंगरा प्रमाणे करतात यामुळे भाषेची गोडी लागते . 


5] शब्दभेंड्या - मुलांचे दोन गट पाडुन एक शब्द एका गटास द्यावा त्या शब्दाचा शेवटच्या अक्षरावरून दुसऱ्या गटाने शब्द सांगावा अशा पध्दतीने हा खेळ खेळता येतो.

6] पाठ कथेच्या स्वरूपात मांडणी करणे व मुले बराचसा प्रतिसाद देतात.

7] नाट्यरूप पाठ सादरीकरण - पाठाची पात्रे ठरवून त्या पाठाचात्या  नाट्यरूपात मांडणी करणे.  


                                       
8] कविता स्वतः च्या चालीवर घेणे 





इंग्रजी विषय उपक्रम -
 
1] Word chain activity -
       

2] English bank -
   


3] picture reading  -



4] Daily attendance -



5] Mind map    -                                                    


                                             

6] Word ladder activity  -                 

           







7]  letter & sound activity for class 1 & 2 -     


8] picture and instructions  activity for class 3 -



9] Up down activity for class 1 & 2  -



10 ] Skit / lesson  presentation - class 3 rd



11]  classroom conversation period -
about  between  Hospital  -




12] Reading pictorial paragraph -



13] simple sentence reading - class 2 -


14]  Three  /  four digits reading - class 3 & 4 -



15]  Days of week by using teaching aids - 





16 ]  Question set activity - 




17] conversation period - between vegetable shopkeeper - 





18] conversation period - grocery shop -






19[  Drama presentation of Sheru -





20] classroom conversation - 






you can see other english activities in my youtube channel .