Saturday, July 18, 2020

Work from Home - weekly test

प्रा.शा.गणपुर इथे मुलांसाठी  सकाळी 8 ते 10 या वेळेत online teaching class सुरू करण्यात आला आहे . मुले घटकानुरूप शिकत आहे म्हणून त्यांच्यासाठी आठवड्यातून एकदा दर रविवारी weekly test 20 गुणांची घेण्यात येत आहे .

इयत्ता तिसरी

इयत्ता चौथी


इयत्ता पाचवी




Monday, July 13, 2020

कार्टूनसह ॲनिमेशनसहीत शैक्षणिक व्हिडिओ


  • मुलांना कार्टुन व्हिडिओ ॲनिमेशन फार आवडते व ते त्यांच्या भावविश्वात रममाण होतात , त्यांना ॲनिमेशन मुळे आपला अध्यापनाचा हेतू साध्य होतो .
  • Study from Home -  मुले घरी राहुनही पाठ्यघटक छानपैकी शिकू शकतात .


हा व्हिडिओ इयत्ता तिसरी - परिसर अभ्यास पाठ पहिला - आपल्या अवतीभवती 1 हा आहे.


ह्यामध्ये सजिव व निर्जिव घटक घेण्यात आला आहे.


या व्हिडिओ मध्ये इयत्ता तिसरी परिसर अभ्यास पाठ 2 रा अबब ! किती प्रकारचे हे प्राणी हा पाठ घेतला आहे.

Monday, June 22, 2020

Flipbook Study From Home ( शाळा बंद पण शिक्षण चालू )

Flipbook - 
 
flipbook द्वारे आपण दैनंदिन अभ्यासमालेतील मुलांनी केलेल्या कृती व उपक्रम यात दर्शवले आहे , हे पुस्तकाप्रमाणे असल्याने पालकांना ही त्यांच्या पाल्यांच्या activities दाखवणे सहज शक्य झाले आहे .
               
https://online.fliphtml5.com/ksozq/yfvf/ 
  
या Flipbook मध्ये मुलांच्या अभ्यासमालेतील ठसेकाम , संकल्प  , चित्र , कागदकाम - राजमुकूट तयार करणे , ओरिगामी पध्दतीने फुलपाखरू तयार करणे , फुलदाणी काढणे , कागदाचा शर्ट तयार करणे इत्यादी .चा समावेश आहे .




Sunday, May 17, 2020

ऊर्जा उपक्रम

मुलांना वाढदिवस म्हटले कि एक त्या दिवासाची ते आतुरतेने वाट पाहतात . त्या दिवशी शुभेच्छा देणारे मित्र त्यांच्या स्मरणात राहतात म्हणून आमच्या शाळेत आम्ही ऊर्जा उपक्रम घेत आहोत , या उपक्रमा मध्ये मुलामुलींचे वाढदिवस शाळेत परिपाठाच्या वेळी घेत आहोत.मुलाला एक पेन व पुष्पगुच्छ देऊन मोबाईल वर वाढदिवसाची धून लावत तसेच आनंदी  टाळ्या वाजवून त्या मुलाचा वाढदिवस आम्ही साजरा करतो .
                  या उपक्रमामुळे मुलांना शाळेची आवड , वाढदिवसाची तारीख स्वतः ची वा मित्राची ही लक्षात राहते . यातुन स्मरण शक्ती वाढण्यास मदत होते .



मुलामुलींचे वाढदिवस साजरे करतांना चे क्षण.


Sunday, April 26, 2020

शैक्षणिक सहल

दरवर्षी शैक्षणिक सहलीचे नियोजन करण्यात येते या शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून मुलांचे अनुभव क्षेत्र रूंदावते . त्यांच्या पुर्व माहितीत भर पडते . धरण , जैन लेण्या , ऐतिहासिक ठिकाणची माहिती मिळते . एकंदरीत मुले आनंदी होतात परत शाळेत आल्यास त्यांच्यात एक नवलपण व शाळेत आनंदी वातावरण निर्मिती होते .  शाळेची ओढ कायमच राहते व सहल जाणार म्हणून  आपल्या जवळील  खाऊच्या पैशाची बचत करून एक चांगली सवय ही मुलांच्या अंगी येते .


  
शैक्षणिक सहल सिध्देश्वर धरण.

शैक्षणिक सहल तिर्थक्शेत्र औंढा नागनाथ 


Sunday, April 19, 2020

कृती आधारीत अध्ययन Activity based learning

Activity Based learning या कार्यक्रमांतर्गत कृती ला प्राधान्य देण्यात आले आहे म्हणजेच कोणताही विषय , त्यातील अध्यापन करावयाचा घटक यात जास्तीत जास्त कृती वापरून अध्ययन अध्यापन केल्यास अधिक प्रभावी ठरते तसेच अध्ययन निष्पत्ती साध्य होण्यास मदत होते.

1] गणित विषय इयत्ता दुसरी , घटक - संख्येचा लहानमोठेपणा कृती युक्त मुलं सादर करतांना .


2] इयत्ता तिसरी विषय - English , Days of the week हा घटक कृती युक्त सादरीकरण.


3] In -out , up - down activity इयत्ता - पहिली .


Wednesday, April 15, 2020

परिसर अभ्यास उपक्रम - मोबाईल ॲपद्वारे अध्ययन व अध्यापन

परिसर अभ्यास या विषयात काही पाठ असे असतात की त्या पाठ्यघटकाचे अध्यापन करताना मुलांना स्वानुभव देणे गरजेचे ठरते. अबब!किती प्रकारचे प्राणी हा पाठ Safari central ह्या ॲप द्वारे शिकवता येतो व मुल जवळुन प्राणी पाहतात .



मुल सहजतेने व आनंददायी पध्दतीने शिकते.



इयत्ता पाचवी - सुर्यमाला व ग्रह घटक शिकवताना  Explorer app  , merge cube द्वारे नाविन्य पध्दतीने शिकवता येतो व मुल सहजतेने आनंददायी पध्दतीने शिकते.